पुणे दि ०१ : -कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड ने किरकोळ खरेदी बंद करून ठोक खरेदी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक सुरळीत रहावी आणि कोरोनाचा फैलाव वाढू नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रविवारपासून दि. 2 ते 16 मे दरम्यान वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार वखार महामंडळ चौक ते मार्केटयार्ड (उत्सव चौक) रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मार्केटयार्ड येथे ठोक खरेदी चालू ठेवली असल्याने याठिकाणी येणाऱ्या वाहनांकरिता, केळी बाजाराच्या गेटमधून प्रवेश दिला जाणार आहे. या लोकांनी बााहेर पडण्याकरिता मेनगेटमधून बाहेर पडून उजवीकडे वखार चौक व डावीकडे मार्केटयार्ड (उत्सव चौक) असे इच्छितस्थळी जावे तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने ( उदा.फायरब्रिगेड , पोलीस वाहने , रुग्णवाहिका इ ) खेरीज करुन आवश्यकत्ते नुसार व ईतर वाहतूक 2 मे च्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.