पुणे २९ :- पुणे शहरातील रविवार पेठेतील सराफी व्यापाऱ्याचा विश्वासघात करुन , सोन्याचे दागिन्यांचा अपहार केलेल्या कारागीर आरोपीतास फरासखाना पोलीसांकडुन ३६ तासाचे आत अटक करुन , त्याचेकडुन २८.५२.५७१ / – ( अठ्ठावीस लाख वावन्न हजार पाचशे एकाहत्तर ) रुपये किंमतीचे ५९८.५९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन व ५००० / – रुपये किंमतीचा १ मोबाईल फोन , व त्याचे कपडे जप्त ज्वेलर्सने पॉलीश
करण्यासाठी दिलले तब्बल 35 लाख 80 हजारांचे दागिने चोरून दौंड रेल्वे स्थानकावरून मूळगावी पश्चिम बंगालमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दागिने जप्त करण्यात आले आहेत. मशीदुल उर्फ मैदुल लालचंद शेख (वय 32, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ज्वेलर्स मनोज मन्ना ( रा. कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मन्ना यांचे बुधवार पेठेमध्ये ज्वेलर्सचे दुकान आहे. मागील पाच वर्षांपासून मशीदुल दुकानामध्ये कामाला होता. त्यामुळे मन्ना यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता.
त्यामुळे मन्ना यांनी त्याच्याकडे 35 लाख 60 हजारांचे दागिने पॉलीश करण्यासाठी दिले होते. मात्र, मशीदुलने दागिने घेऊन मूळगावी पळ काढला होता. व फरासखाना पोलीस स्टेशनकडील तपास पथाचे प्रभारी अधिकारी अभिजीत पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक , व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस स्टाफने मा . वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयातील आरोपी मशीदुल ऊर्फे मैदुल लालचंद शेख , वय ३२ वर्षे , रा . सध्या रविवार पेठ , भोहरी आळी , पुणे , मुळ गाव सांगीपाडा , शेखवाडा , जि.हुगळी , पश्चिम बंगाल याचा शोध घेत असताना तो दौंड रेल्वे स्टेशनजवळ थांबला असुन , तो पश्चिम बंगाल येथे पळुन जाण्याच्या तयारीत आहे अशी गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली . त्यानुसार वरीष्ठांचे मार्गदर्शन व सुचनांनुसार फरासखाना पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी सदर आरोपीताचा दौंड रेल्वे स्टेशन येथे जावुन शोध घेतला असता तो दौंड रेल्वे स्टेशनकडील , दुर्गामाता मंदीरा समोरील रोडवर दिनांक २८/०४/२०२१ रोजी १०.०५ वा . मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन अठ्ठावीस लाख बावन्न हजार पाचशे एकाहत्तर रुपये किंमतीचे ५९८.५९ ग्रॅम
वजनाचे सोन्याचे दागिने व ५००० / – रुपये किंमतीचा १ मोबाईल फोन , पंचासमक्ष पंचनाम्याने जप्त करुन त्यास दिनांक २८/०४/२०२१ रोजी १६.१० वा अटक करण्यात आली असुन , आरोपीतास मा . न्यायालयाचे समक्ष हजर केले असता मा . न्यायालयाने त्यास दिनांक ३०/०४/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे . पुढील तपास अभिजीत पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक , हे करीत आहेत . सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर , डॉ.संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ -१ पुणे डॉ . प्रियंका नारनवरे , सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली.राजेंद्र लांडगे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन पुणे , राजेश तटकरे , पोलीस निरीक्षक , ( गुन्हे ) , फरासखाना पोलीस स्टेशन , अभिजीत पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक , अजितकुमार पाटील , पोलीस उप निरीक्षक , पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी , मेहबुब मोकाशी , सयाजी चव्हाण , शरद वाकसे , वैभव स्वामी , महंमद हनीफ शौकत शेख , मोहन दळवी , सचिन सरपाले , आकाश वाल्मीकी , राकेश क्षीरसागर , मयुर भोकरे , अभिनय चौधरी , ऋषीकेश दिघे , अमोल सरडे , महावीर वलटे , यांच्या पथकाने केली आहे .