कर्जत दि २९ :- कर्जत शहरात ५ ठिकाणी अचानक नाकाबंदी लावून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कर्जत पोलिसांनी कारवाई केली तसेच वारंवार सांगून सुद्धा न ऐकणार्यांना पोलीस ठाण्यात नेऊन बसविले आणि कोरोना पेशंट कशा प्रकारे उपचार घेत आहेत, औषधे, बेड, ऑक्सिजन याचा कसा काटकसरीने वापर सुरू आहे.याची माहिती देऊन उपजिल्हा रुग्णालयात नेऊन पेशन्टची अवस्था कशी आहे याची माहिती दिली तसेच नागरिकांवर दंडात्मक कारवाई देखील केली. खूप वेळा सांगूनही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना कोरोना झाल्यावर रुग्णांची काय अवस्था होते याचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे जवळ नेऊन माहिती देऊन जाणीव करून दिली.सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुरेश माने, पोसई किरण साळुंखे पोलीस जवान संतोष जसाभाटी, महादेव गाडे, बाळासाहेब यादव, शेख बळीराम काकडे, गोवर्धन कदम, वैभव खिळे, देवा पळसे, गणेश आघाव, गोरख जाधव तसेच होमगार्ड व पोलीस मित्र यांनी केली..
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे