संगमेश्वर दि २९: – तालुक्यातील रांगव गावी नाम फाउंडेशन च्या सहकार्याने रांगव नदी पुनर्जीवन आणि गाळ उपसा कार्यक्रमाचा शुभारंभ दि.०४ एप्रिल रोजी करण्यात आला होता .हा कार्यक्रम समस्त रांगव ग्रामस्त आणि मौजे रांगव युवा संघटना ( मुंबई सह ग्रामस्थ ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. तीन गावचे मानकरी श्रीकांत गो. सरमोकादम उभयतांनी गंगेची विधिवत पूजन करून व ओठी भरून पोकलन ला पुष्पहार घालून गाळ उपसण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून नाम फाउंडेशन चे कोकण प्रांत समन्वय समीर जानवळकर तसेच माजी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, पंचायत समिती सदस्य प्रेरणा कानाल, गावचे पोलिस पाटील श्री. प्रकाश वाकणकर सरपंच दत्ता लाखन ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
रांगव गावातील धरणाचे काम चालू असताना नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात माती साचली होती आणि नदीपात्रात वनस्पती वाढल्या होत्या, त्यामुळे नदी पात्रातील पुराचे पाणी आजूबाजूच्या शेतात घुसून शेतीचे नुकसान होत असे ही अडचण ओळखून रांगव युवा संघटने च्या सदस्यांनी नाम फाउंडेशन शी संपर्क करून ही समस्या त्यांना सांगितली आणि हे विधायक काम करण्याची विनंती केली.तसेच रांगव गावाची भौगोलिक परिस्थिती याच्या अभ्यासासाठी जलतज्ञ अजित गोखले व अविनाश निवाते यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा प्रकल्प अहवाल तयार करून दिला आणि रांगव मधील उपक्रमांना सहकार्य करेल असा विश्वास व्यक्त केला.
सद्यस्थितीत काम सुरु असून ३ कि.मी पर्यंत लांबीतील नदीतील गाळ उपसा केला जाणार असून या उपक्रमामुळे पाणी साठा कायम राहून पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे. नदीची खोली वाढल्याने पुराचे पाणी शेतात जाण्याचा धोका टळू शकतो. या कामासाठी गावातील आशिष ,चंद्रकांत मिरगळ, विरेस कुंभार, अनंत कदम, यशवंत कुंभार, तुकाराम कदम, प्रभाकर रांगणेकर, संतोष धामणस्कर यांचे सहकार्य लाभत आहे.तसेच या कामाचे पंचक्रोशी मध्ये कौतुक होत आहे.
रत्नागिरी प्रतिनिधी :- संतोष येडगे