पुणे दि २७ :धमक्या देऊन खंडणी उकळणे व सराफ व्यवसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनच्या अटकेत असलेल्या ऍड.दिप्ती सरोज काळे या वकिल महिलेने ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. काळे हिच्यासह निलेश उमेश शेलार यांच्याविरुद्ध ” ज्वेलर्स’चे मालक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी काळे हिला तीन दिवसांपूर्वी अटक केली होती. दरम्यान, काळे हिने न्यायालयीन कोठडीत असल्याने तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यावेळी ती कोरोनाबाधीत आढळल्याने तिच्यावर ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावर उपचार सुरू होते.दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास काळे ही तेथील स्वच्छतागृहामध्ये गेली. त्यानंतर तेथील ती 20 ते 25 मिनीटे बाहेर पडली नाही. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्याने दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडण्यात आला, तेव्हा काळे हिने स्वच्छतागृहातील खिडकीच्या काचा काढून आठव्या मजल्यावरुन खाली उडी मारुन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले.