शिरुर प्रतिनिधी दि २६ :- शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावचे नामांकित पवार कुटुंबीय आहे.यामधील सहा महिन्याच्या कालावधीत अरुण पवार यांच्या जाण्याने दुसरा मोठा धक्का पवार कुटुंबीयांना बसला आहे.सहा महिन्यापूर्वी अरुण पवार यांचे बंधू सुभेदार.अंबादास वामन पवार यांचे कोरोना मुळे निधन झाले. त्यानंतर काही महिन्यातच काल आरुण पवार यांचे कोरोना ने निधन झाल्यामुळे पवार कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा आघात झाला आहे.युवा उद्योजक सचिन पवार व अजित पवार यांचे ते वडील होते व बिजम वामन पवार,प्राचार्य गोकुळ वामन पवार,खंडुशेठ वामन पवार,राजू वामन पवार यांचे ते भाऊ होते.
व अण्णापूर गावचे ग्रामपंचायत सदस्य पप्पूशेठ पवार,नंदूशेठ रामदास पावार,संतोष बिजम पवार(पि.एस.आय)यांचे ते चुलते होते.कै.अरुण पवार यांच्या पश्चात दोन मुले चार मुली,पत्नी,सुन,असा मोठा परिवार आहे.