कर्जत दि २६ :-कर्जत परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना कर्जत पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्या ताब्यातून१० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विकी विश्वास काळे, रा.श्रीगोंदा,नंद्या पायथ्या पवार, रा.श्रीगोंदा अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.दिनांक २० एप्रिल रोजी विशाल नारायण दळवी रा.शहाजी नगर,कर्जत यांनी फिर्याद दिली होती कि,त्यांच्या राहत्या घरात कुणीतरी अज्ञात चोरट्याने रात्री घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून १० हजार रुपये किमतीचा एम.आय कंपनीचा मोबाईल व रोख २ हजार रुपये चोरून नेले होते. या गुन्ह्याचा शोध घेण्याकरिता कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अधिकारी व पोलीस अंमलदार यांना योग्य सूचना देऊन गुन्हा
उघड करण्याबाबत आदेश दिले होते.त्यानुसार, तपास चालूअसताना सदरचा गुन्हा हा श्रीगोंदा येथील आरोपींनी केल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली.त्यानुसार दि. २०/०४/२०२१ रोजी विकी विश्वास काळे, रा.श्रीगोंदा यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याचे कबूल केले.तसेच त्याचा दुसरा साथीदार नंद्या पायथ्या पवार, श्रीगोंदा यास दिनांक २४एप्रिल रोजी श्रीगोंदा येथून अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,स.पो.नि सुरेश माने,पोलीस जवान अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव,सुनील खैरे यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार सलीम शेख हे करत आहेत.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे