पुणे दि.२४ : कोव्हिडं-१९ च्या वाढत्या रुग्ण संख्यामुळे हॉस्पिटल कमी पडत आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार प्रशासनाकडून होत आहे. पुणे जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने दौंड येथील रेल्वेचे रुग्णालय बंद असल्याबाबत दौंड शिवसेना पदाधिकारी यांनी लेखी निवेदन महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांना दिले. सातत्याने रुग्णांना आवश्यक असणारी मदत व पाठपुरावा ना.डॉ.गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहेच. याचाच एक भाग दौंडच्या कार्यकर्त्यांचे निवेदन प्राप्त झाल्यानंतर तात्काळ ना.डॉ.गोऱ्हे ह्या तात्काळ सोलापूर डीएमआर यांच्याशी पत्र व्यवहार केला. आणि दौंड रेल्वेचे इस्पितळ दौंड येथील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
त्यानुसार काल दि.२३ एप्रिल २०२१ रोजी रेल्वे प्रशासनाने सदरील विनंती मान्य करून हे हॉस्पिटल शासनास वापरण्यासाठी दिले. याबाबत काल तहसीलदार दौंड संजय पाटील आणि मंडळ अधिकारी सुनील जाधव यांनी ताबा घेण्याचे पत्र प्राप्त झाले. आज हॉस्पिटल ताब्यात घेण्याची कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार दौंड यांनी ना.डॉ.गोऱ्हे यांना दूरध्वनीवरून सांगितले. तसेच दौंड उपविभागीय अधिकारी श्री गायकवाड यांच्याशी चर्चा करून हे हॉस्पिटल सरकारी यंत्रणा किंवा खाजगी यंत्रणेला देण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर ज्या खाजगी संस्था हे हॉस्पिटल चालविण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी तहसीलदार दौंड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील तहसीलदार पाटील यांनी यावेळी केले आहे.
संपर्क: स्वीय सहायक, प्रवीण सोनवणे : 7972770533