पुणे दि २४ :- कोविड -१९ या आजाराचा वाढवा संसर्ग लक्षात घेवून राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये दि . २२/०४/२०२१ रोजी २०.०० वा.पासुन ते दि .०१ / ०५ / २०२१ रोजी पर्यंत लॉकडाऊन जाहीर केलेले आहे . सदर कालावधीत अत्यावश्यक कारणाकरीता एका जिल्हयातुन दुस – या जिल्हयात नागरीकांना प्रवास करावयाचा असल्यास किंवा आंतरराज्य प्रवास करावयाचा असल्यास त्यांना covid19.mhpolice.in या वेब साईटवर विनंती अर्ज केल्यानंतर परवानगी देण्यात येत आहे . सध्या नागरीकांना मयत , लग्न , वैदयकिय कारण , विमानप्रवास या कारणांकरीता डिजीटल पास देण्यात येत आहे . सदर सुविधा ही दि .२३ / ४ / २०२१ रोजी पासून कार्यान्वित करण्यात आली आहे . अत्यावश्यक कारणाकरीता आंतरजिल्हा प्रवास करण्याची परवानगी पुणे शहरात राहणा – या ज्या नागरीकांना हवी असेल त्या नागरीकांनी वरील वेबसाईटवर विनंती अर्ज भरताना जर अंत्यविधीसाठी जावयाचे असल्यास मयताशी नाते संबंध काय याबाबत उल्लेख करावा . वैदयकिय कारण असेल हॉस्पीटल ट्रीटमेंटसाठी हॉस्पीटल अपॉईंटमेंट मॅसेज , लेटर , हॉस्पीटल व्हॉटस्अॅप मॅसेज हॉस्पीटल अॅडमीट कागदपत्रे सोबत सादर करणे आवश्यक आहे , लग्नासाठी लग्नपत्रिका अशी कागदपत्रे सोबत सादर करणे आवश्यक आहे . सदर सोबत जोडलेल्या कागदपत्रांची पाहणी केल्या नंतरच त्यांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहेत . आतापर्यंत प्राप्त झालेल्या काही विनंती अर्जा सोबत कागदपत्रे सादर केलेली नसल्याने तसेच अपुरी माहिती भरली असल्याने डिजीटल पास देण्यास अडचण निर्माण होत आहे . तसेच पुणे शहरातील अत्यावश्यक सेवा घटकातील हॉस्पीटल डॉक्टर व इतर स्टाफ , बँक कर्मचारी , भाजीपाला विक्रेते , फळविक्रेते , दुध विक्रेते , मेडीसीन सप्लायर , मेडिकल स्टाफ , सरकारी कर्मचारी , पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी , हॉस्पीटल सफाई कर्मचारी यांनी पुणे शहर हद्दीत दैनंदिन कामकाजाकरीता जाताना डिजीटल पासची आवश्यकत नसल्याने आपण नाकाबंदी ठिकाणी आपले अधिकृत ओळखपत्र दाखवून प्रवास करु शकतात . पुणे शहर पोलिस दलाच्या वतीने मा.पोलीस आयुक्त , पुणे शहर श्री.अमिताभ गुप्ता यांनी शहरातील नागरीकांना अत्यावश्यक कारण असेल तरच घरा बाहेर पडावे नाही तर घरा बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे . घरी रहा सुरक्षित रहा