श्रीगोंदा दि.१६:-संघर्ष फाऊंडेशन संचलित महापुरुष जयंती उत्सव समिती मढेवडगाव यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्ताने जगभरात ज्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घालून हाहाकार माजवला आहे व त्या आजाराला बळी पडल्यामुळे अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहे त्यामुळे अनेक लोकांची कुटुंब उदवस्थ झालेली आहे ह्या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर असे लक्षात आले की कोरोना महामारीत प्रशासन व्यवस्था चांगल्या प्रकारे कामं करत आहे, सर्व डॉक्टर- नर्स -पोलीस प्रशासन आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहे पण तरीही कोरोना आजाराचे रुग्ण कमी होताना दिसतं नाही त्यामुळे अनेक गोष्टींचा तुडवडा होताना आपल्याला पाहिला व ऐकायला मिळत आहे,म्हणून प्रशासना द्वारे संपुर्ण महाराष्ट्रात व देशात रक्तदान करा म्हणून आव्हान करण्यात आले होते.या सर्व परीस्थीतीचा आढावा घेतल्यानंतर व या कोरोना सदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी अर्पण ब्लड बँक अहमदनगर याच्या मार्फत भव्य असे रक्तदान शिबीर मढेवडगाव येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये 101 तरुणांनी उस्फुर्त असा सहभाग नोंदवून रक्तदान केले.हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी संघर्ष फाउंडेशनचे सदस्य व मढेवडगाव ग्रामपंचायत सदस्य राहुलजी साळवे,प्रा.गोरखराजे उंडे,अक्षय ससाणे,प्रा.योगेश मांडे,सुभाष काका शिंदे,प्रा.फुलसिंग मांडे, संतोष गुंड, स्मितल वाबळे, संतोष मांडे, प्रमोद शिंदे,अभय गुंड,पूजाताई साळवे,योगीता साळवे,दीपक ससाणे,दीपक साळवे , सुनील ननवरे,केतन साळवे,संग्राम शिंदे,विशाल मांडे, डॉ.शिंदे,डॉ.नलगे,डॉ.गवते, डॉ.भंडारी यांची महत्वपूर्ण कामगीरी होती.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे