पुणे दि ४ :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने संचारबंदीचे आदेश दिले, या आदेशांची पुणे पोलिसांकडून शनिवारपासून अंमलबजावणीही सुरू झाली.आहे व विनाकारण फिरणाऱ्यांची मात्र गय केली जाणार नसल्याचे पुणे शहर पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.आहे मात्र संबंधीत आदेशामध्ये ओळखपत्र नसणाऱ्या घरेलू कामगार, असंघटीत कामगार तसेच रात्रीच्यावेळी प्रवाशांना ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेबाबत कुठलीच स्पष्टता करण्यात आलेली नाही. तरीही संबंधीत घटकांना त्रास होणार नाही, त्यांचाही संवेदनशीलतेने विचार करून योग्य दखल घेतली जाईल, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांची मात्र गय केली जाणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
सायंकाळी सहा वाजता संचार बंदी सुरू झाल्यानंतर पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी शनिवारी शहराच्या वेगवेगळ्या भागात रस्त्यावर उतरून पाहणी करीत होते.पुणे
शहरात ठिकठिकाणी बॅरीकेडस लावून पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नागरीकांची चौकशी केली जात होती. त्याच पद्धतीने काही ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः नागरीकांना थांबवून त्यांची चौकशी करून सोडत होते
नागरीकांनी योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, ज्या कारणासाठी ते बाहेर येत आहेत, त्याविषयीची कागदपत्रे जवळ बाळगावीत. सबळ कारण असणाऱ्या नागरीकांना सहकार्य केले जाईल, तर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिस आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केले.
ओळखपत्र, कंपन्यांचे पत्र, आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत
रात्री शहरातुन ये-जा करणाऱ्या कामगारांनी त्यांचे कंपन्या, आस्थापानांचे ओळखपत्र किंवा त्यांनी दिलेले पत्र स्वतःजवळ ठेवावे. तसेच वैद्यकीय,प्रवास किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी बाहेर पडताना वैध कागदपत्रे जवळ ठेवावीत. त्यांची पोलिसांकडून अडवणूक होणार नाही.
प्रवाशांसाठी रात्रीच्या वाहतुक व्यवस्थेचे काय?
रात्रीच्यावेळी शहरात येणाऱ्या किंवा बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना घरी किंवा इच्छितस्थळी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था कशी असणार आहे, हा प्रश्न नागरीकांकडून उपस्थित केला जात आहे. त्याबाबतही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रात्रीच्यावेळी येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे वैध कारण तपासले जाईल. त्यांच्याकडे प्रवासासाठीचे योग्य कारण, बस तिकीट, अन्य कागदपत्रे पाहिली जातील. रात्रीच्यावेळी अडकलेल्या प्रवाशांना वाहतुक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सुचना पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे यांनी अपर पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्तांना दिल्या आहे. त्यांच्यामार्फत संबंधीत पोलिस अधिकाऱ्यांनाही सांगण्यात आले आहे. “वेळप्रसंगी पोलिस स्वतःच्या वाहनांमधून नागरीकांना पोचवतील’ असे डॉ.शिसवे यांनी स्पष्ट केले.