कर्जत दि २३:- दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळी पाटेगाव ते पाटेवाडी परिऐ गस्तीवर असलेल्या पोलिसांनी अटक केली आहे दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांनी गून्हा दाखल केला आहे.सविस्तर माहिती अशी की,दि. २२रोजी मध्यरात्री २ वाजता फोनद्वारे माहिती मिळाली की पाटेगाव आणि पाटेवाडी शिवारात काही इसम संशयास्पद रित्या फिरत आहेत.त्या अनुषंगाने रात्रगस्त अधिकारी पी एस आय मोरे, पोलीस जवान सरोदे, सुपेकर चालक बेग यांना तात्काळ रवाना केले.
नगर-सोलापूर महामार्गावर ४ ते ५ इसम रस्त्यावर येवून गाडी अडविताना दिसले. अधिकारी आणि पोलीस जवान यांनी स्थानिक लोकांचे मदतीने संशयित इसमाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता ते गुंगारा देऊन पळून गेले. त्यांचा पाठलाग सुरू झाला. त्यापैकी शाहूराज बाबासाहेब कोकरे, रा. ता. कर्जत याची गाडी २२० पल्सर रस्त्याचे बाजूला असलेल्या खड्यात जावून तो खाली पडला. त्यास तात्काळ ताब्यात घेतले. त्याचे कडे विचारपूस केली असता त्याने शाहूराज बाबासाहेब कोकरे, 21 वर्षे, रा. घाट पिंपरी, ता. आष्टी, जि. बीड येथील असल्याचे सांगितले.व बाकीच्या सहकारी आरोपीचे नावे पुढीलप्रमाणे
आकाश कोपनर, रा. काळेवाडी-राशीन, ता. कर्जत ,शहाजी शिरगिरे, वय 24 वर्षे, रा. जामवाडी, ता. जामखेड
बाळू, पूर्ण नाव पत्ता माहिती नाही अशांचे मदतीने दरोडा टाकण्याच्या तयारीत होतो, असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांचेकडे एक सुरा, एक मोबाईल मिळून आला. पोलीस जवान सरोदे यांचे फिर्यादीवरून दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास पो स ई मोरे हे करीत आहेत. सदर अटक आरोपी हा टू प्लस मधील आरोपी असून इतर फरार आरोपी योगेश गोयेकर हा सुद्धा टू प्लस मधील आरोपी आहे.सदर अटक आरोपी हा दौड पोलीस ठाणे येथील गुन्हातील फरार होता.आरोपिकडून जप्त केलेला मोबाईल हँडसेट हा इंदापूर पोलीस स्टेशन गुन्हा मध्ये चोरी गेलेला आहे. सदर चा गुन्हा उघडकीस येत आहे.आरोपिकडून जप्त गाडी पल्सर२२० हिच्यावर सुद्धा चुकीचा नंबर टाकलेला आहे. ती सुद्धा चोरीची असण्याची शक्यता आहे. पो स ई अमरजीत मोरे, पो. शि.सुपेकर, पो. शि.सरोदे, चा.पो.शि.बेग यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पो.स. ई. अमरजीत मोरे, पो. शि. सुपेकर, पो. शि.सरोदे, चा.पो.शि बेग यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून कारवाई स्थानिक नागरिक निंबाळकर, पाटील आणि इतरांच्या मदतीने केली.सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक मनोज पाटील ,अपर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. चंद्रशेखर यादव,पो. स.ई अमरजीत मोरे, पोलीस जवान वैभव सुपेकर, जितेंद्र सरोदे, महादेव कोहक यांनी केली.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे