पुणे ग्रामीण दि २७ : – चारिञ्याच्या संशयावरुन महिलेचा धारदार शस्ञाने गळ्यावर वार करुन खुन करण्यात आल्याची घटना घडल्याने – शिरुर शहराजवळील वाडा कॉलनी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बबन पर्वतराव शेटे यांनी शिरुर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. सारिका सुदाम गिरमकर(वय 30, रा. मुळ.कु-हाडवाडी,ता.शिरुर) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे.तर दत्ताञय गेणुभाऊ गायकवाड(रा.शिंदोडी) आरोपीचे नाव आहे.या प्रकरणी शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर शहरातील वाडा कॉलनी येथे फिर्यादी बबन शेटे यांच्या भाडयाच्या खोल्या आहेत.यामधील एका भाड्याच्या खोलीत मयत सारिका व आरोपी दत्ताञय गायकवाड हे भाडेकरु पती पत्नी म्हणुन एकञ राहत होते. माञ सारिका व दत्ताञय गायकवाड यांच्यात काही दिवसापासून सातत्याने भांडणे होत असल्याने फिर्यादी यांनी दोघांनाही घर खाली करण्यास सांगितले होते.
दरम्यान आरोपी दत्ताञय गायकवाड याने सोमवार (दि.२७) रोजी राञी पावणे दोन च्या सुमारास मयत सारिका हिचे एका मुलावर प्रेम असल्याच्या संशयावरुन धारदार शस्ञाने गळा कापुन खुन केला. आणि कंपनीत कामाला निघून गेला .यानंतर आरोपी दत्ताञय गायकवाड स्वत:हुन शिरुर पोलिस स्टेशनला हजर होउन घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. घटनेची माहिती समजताच शिरुर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन पंचनामा केला आहे. खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.या नंतर उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. या गुन्हाचा पुढील तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक प्रविन खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक बी.एन काबुगडे करत आहेत.