वैजापुर दि २३ :-वैजापुर तालुक्यातील शिवराई येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी वैजापुर तालुक्याचे आमदार प्रा रमेश पा बोरनारे सर व मा जिल्हा परिषद सदस्य मनाजी पा मिसाळ यांनी शिवराई येथे भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन शिवपूजन केले. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र अशा घोषणा देण्यात आल्या.कोरोना काळात सोशल डिस्टनसिंग पाळण्यात आला. तसेच सामाजिक अंतर ठेवण्यात आले होते. यावेळी कचरू आण्णा डिके, सारंगधर डिके, रणजित चव्हाण, संभाजी डुकरे, हरिभाऊ आदमाने, योगेश शिंदे, शिवराई गावाचे सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व गावातील सर्व लोकप्रतिनिधी आजी माजी प्रमुख पदाधिकारी शिवप्रेमी आदि उपस्थित होते.
वैजापुर प्रतिनिधि गणेश ढेंबरे.