पुणे दि २३ :- रेल्वे कंत्राटी कामगारांना लॉकडाऊ न काळातील पगार न मिळणे ,मागासवर्गीय कामगारांना जातीवाचक बोलने , त्यांचावर अन्याय करणे दुय्यम वागणूक देणे,कामगारांना बेकायेशीररित्या कामावरून काढणे ,कामगारांचे सर्व्हिस रेकॉर्ड जाणून बुजून खराब करणे या गोष्टींना जबाबदार असणाऱ्या रेल्वे अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र रेल ठेका मजदुर युनियन अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटने च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.रेल्वे मध्ये विविध प्रकारची कामे करण्यासाठी कंत्राटी कामगार भरती केली जाते .परंतु या कामगारांची पिळवणूक संभदित अधिकारी आणि ठेकेदार हे संगनमताने करत असल्याची अनेक तक्रारी कंत्राटी ठेका संघटनेकडे आल्या आहेत .त्यासाठी सदर संघटने ने आपल्या मागण्यांचे निवेदन मंडल रेल प्रबंधक पुणे यांच्याकडे वारंवार करूनही दखल घेतली जात नव्हती त्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले .शिवाय केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ,केंद्रीय रेल्वे मंत्री ,अनुसूचित जाती जमाती आयोग,मुख्यमंत्री महाराष्ट्र आणि इतर सामाजिक संस्थांकडे या बाबत न्याय मिळण्यासाठी मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.येत्या आठ दिवसात मागण्या मान्य न झाल्यास अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा रेल ठेका मजदुर युनियन ने दिला आहे .या पत्रकार परिषदेस स्वतंत्र रेल ठेका मजदुर युनियन चे अध्यक्ष मनोज गायकवाड ,संदिप गायकवाड (संघटक, स्वतंत्र रेल ठेका युनियन), महेश कांबळे (शहर संघटक, वंचित बहुजन आघाडी) संदीप गायकवाड- स्वतंत्र रेल ठेका मजदूर यूनियन(राष्ट्रीय संघटक) , रवी देडे (पुणे मंडल अध्यक्ष)
;प्रभु गवली (स्वतंत्र मजदूर यूनियन) ,विनोद यादव (उपाध्यक्ष)
,महेश कांबळे (वंचित बहुजन आघाडी) ,मिलिंद दिवे(वंचित बहुजन आघाडी खेड़ा तालुका अधक्ष)सोमनाथ अल्हाट
,राजेश हनवटे समाधान चौहान यावेळी उपस्थित होते.