पुणे, दि.१९ : कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत केवळ पुणे जिल्हा ग्रामीण कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद तसेच सर्व छावणी परिषद हद्दीतील सर्व मटन, चिकन, अंडी, मासे इ. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी किरकोळ व ठोक विक्री करणारी दुकाने दि.१९ जुलै २०२० रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत चालु राहतील, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.दि.१९ जुलै २०२० रोजी सर्व सबंधित व्यवसायधारक यांनी नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवुन वस्तूंची विक्री होण्यासाठी यापुर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्व उपाय करावेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.सर्व किराणा दुकान, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, मटन, चिकन,अंडी, मासे,इत्यादीची विक्री व्यवसाय करणारी व्यापारी दुकाने दि.१४ जुलै २०२० ते दि.१८ जुलै २०२० पर्यंत संपुर्णत: बंद होती, सतत (पाच) दिवस हि दुकाने बंद राहिल्यामुळे पुढील कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा होण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी म्हणून, मागील आदेशामध्ये सुधारणा करण्यात आली आहे, असे आदेशात म्हटले आहे.