मुंबई दि ०४ :- भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात कोरोनाच्या संकटकाळात केलेल्या सेवाकार्याची माहिती शनिवार दि. ४ जुलै रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या या बैठकीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील मा. पंतप्रधानांना पक्षाने केलेल्या सेवाकार्याची माहिती सादरीकरणाद्वारे देतील.
भाजपाच्या मुंबईतील दादर येथील वसंतस्मृती कार्यालयात दुपारी ४ ते ६ या कालावधीत कार्यक्रम होईल. महाराष्ट्रासोबत एकूण सात राज्यातील पक्ष संघटना आपापल्या राज्यात केलेल्या सेवाकार्याची माहिती देतील. बैठकीचा समारोप मा. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाने होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चच्या रात्री बारापासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर लगेचच भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगतप्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सेवाकार्याची सूचना दिली होती. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना अन्न देणे, शिधा वाटप, मास्क किंवा फेस कव्हर वाटप, ज्येष्ठ नागरिकांना आधार देणे, आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्यास प्रोत्साहन देणे असे विविध प्रकारचे सेवाकार्य भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निर्देशानुसार केले. राज्यातील अशा सेवाकार्याची माहिती शनिवारी मा. पंतप्रधानांना सादर करण्यात येईल.
(मुकुंद कुलकर्णी)
कार्यालय सचिव
https://bit.ly/SewaHiSangathan