पुणे दि २०:- पुणे रांजणगाव औदयोगीक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणारे सात गुंडांना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी केले तडीपार देशात सध्या कोरोना संसर्गाचे अनुशंगाने शासनाने लॉकडाऊन घोषीत केलेला आहे . त्याकाळामध्ये देशाची अर्थिक स्थीती मजबुत राहवी म्हणून औदयोगीक उदयोग धंदे शासनाने चालू केलेले आहेत . परंतू काही समाजकंठक गुंडाकडून औदयोगीक क्षेत्रामध्ये दहशत निर्माण करण्यात येते , त्याअनुशंगाने रांजणगाव औदयोगीक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणारे समाज कंठक गुन्हेगार टोळयांची माहीती घेवून , त्यांचेवर असणारे गुन्हेगारी रेकॉर्ड काढून कडक कारवाई करणे बाबत संदिप पाटील , पोलीस अधीक्षक सो , पुणे ग्रामीण यांनी आदेशीत केले होते . त्याप्रमाणे रांजणगाव औदयोगीक वसाहतीमध्ये सन २०१६ पासून १ ) रविंद्र पोपट काळे रा . सोनेसांगवी ता.शिरूर जि पुणे याने त्याचे साथीदार २ ) काळुराम उर्फ कल्पेश शांताराम डांगे वय- ३१ वर्षे रा.सदर , ३ ) प्रमोद शांताराम डांगे वय २२ वर्षे रा.सदर , ४ ) वैभव नारायण खिलारे वय २१ वर्षे रा . सदर , ५ ) आस्तिक खंडु बो – हाडे वय २२ वर्षे रा . सदर , ६ ) अक्षय दिलीप टेमगिरे वय २१ वर्षे रा . विठ्ठल नगर , आनंद कॉम्पलेक्स , ए विंग दुसरा मजला शिरूर ता . शिरूर जि पुणे , ७ ) अक्षय उर्फ मुन्ना अंबर पवार वय २१ रा . खटाटे वस्ती , टाकळी हजी ता . शिरूर जि पुणे यांनी एकत्र येवून टोळी तयार करून रांजणगाव औदयोगीक पपरीसरामध्ये बरेच गुन्हे केले होते . व त्यांची लोकांचेमध्ये व औदयोगीक परीसरात दहशत होती . म्हणून त्या सात गुंडांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम १ ९ ५१ चे कलम ५५ प्रमाणे संदिप पाटील , पोलीस अधिक्षक सो पुणे ग्रामीण यांनी पुणे जिल्हयातील शिरूर , दौंड , खेड व अहमदनगर जिल्हयातील श्रीगोंदा , व पारनेर या तालुक्यातुन तडीपार केले आहे . सदर कारवाई ही संदिप पाटील पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण , यांचे आदेशा वरून व मा.मीलिंद मोहीते , अपर पोलीस अधीक्षक बारामती , एश्वर्या शर्मा ( IPS ) , उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड , पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेशन शाख पुणे ग्रामीण , यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत , सहा.पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम , पोलीस उप निरीक्षक शुभांगी कुटे , पो.हवा तुषार पंदारे , पोलीस नाईक चंद्रकांत काळे , प्रफुल्ल भगत , अमोल चव्हाण , किशोर तेंलग , रघुनाथ हळनोर रांजणगाव पोलीस स्टेशन यांनी केली आहे . पुढील काळात रांजणगाव औदयोगीक परीसरात ठेकेदारी करीता गुन्हेगारी कृत्य व दहशत निर्माण करणारे बेकायदेशिर ग्रुप , टोळया व गुन्हेगारी पार्श्वभुमी असणाऱ्यावर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे . असे संकेत संदिप पाटील , पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी दिले आहेत . .