पुणे दि 06 : – पुणे शहर पोलीस दलातील एका ‘ पोलीस कर्मचाऱ्यासह खासगी व्यक्तीवर आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 12 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात या कर्मचाऱ्याचे गुन्हा दाखल केला व सर्वच वजनदार कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली असून, पोलीस दलात मोठी खळबळ माजली आहे.विलास मोहन तोगे (वय 39, बक्कल न. 4737) वर्ग -3 नेमणूक वारजे माळेवाडी पोलिस स्टेशन पुणे व बाळासाहेब चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांचे दुकानावर खंडणी विरोधी पथकाने दि 20.5.2020 व दि 21.5 रोजी कारवाई केली होती.
याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पोलिसांनी DVR जप्त केला होता. यानंतर यामध्ये अटक न करण्यासाठी तसेच DVR परत करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली. त्यातील 38 हजार रुपये घेतले होते.परंतु उर्वरित 12 हजार रुपयांची मागणी केल्यानंतर यातील तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस उपआयुक्त ,पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे