पुणे, दि २४ :- चतुर्श्रुंगी पोलीस ठाणेचे हद्दीत बाणेर येथे अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक. पुर्व विभाग गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून ७९ हजार २०० रुपयांची दुकानामध्ये मध्ये वेगवेगळया कंपनीच्या देशी विदेशी सिगारेट, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ, साठा पकडला आहे.व एकाला पकडण्यात आले आहे कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांनी सर्व देशभरात लॉकडाऊन घोषित केलेला असून परिस्थितीचा फायदा घेवून अत्यावश्यक वस्तूंची साठेबाजी व चढया दराने विक्री करणा-या दुकानदारांवर, बेकायदेशीर हातभट्टी दारु तसेच सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणा-यांवर कारवाई करणेबाबतचे आदेश पोलीस आयुक्त,पुणे शहर यांनी पुणे शहरातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांना दिले आहेत व त्या बाबत अपर पोलीस आयुक्त, अशोक मोराळे यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.सदर आदेशाचे अनुशंगाने गुन्हे शाखेचेअप्पर पोलीस आयुक्त, अशोक मोराळे,मा.पोलीस उपआयुक्त.बच्चन सिंह यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आपापले हद्दीमध्ये गोपनीय माहिती काढून पेट्रोलिंग करून कारवाई करणेबाबत आदेशित केलेले आहे. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त,अभियोग.विजय चौधरी व अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक. पुर्व विभाग गुन्हे शाखेच्या पथकाने यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी कारवाई करणे बाबत आदेशित केले आहेत. व पुणे शहरामध्ये कोरोना विषाणुंचा वाढता प्रादर्भाव व शहरात लॉकडाऊन संचारबंदीचे अनुष्ंगाने तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करणेसाठी पेट्रोलींग फिरत असतांना पोलिसांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चर्तु:श्रृंगी पो. स्टे हद्दीत इसम नामे भावेश समारामजी चौधरी,वय –३० वर्षे, रा.व्हिडोज सोसायटी, फ्लॅट नं ९ बाणेर पाषाण लिकं रोड पाषाण पुणे याने उत्तम सुपर स्टोअर्स काप्स भवन सोसायटी,सं नं १३२/२ बाणेर पाषाण लिंक रोड पाषाण पुणे या ठिकाणी किराण दुकानात चोरुन तंबाखूजन्य सिगारेट बाजारभावापेक्षा चढया भावाने ओळखीच्या लोकांना विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पंचां समक्ष वरील स्टाफचे मदतीने छापा टाकुन किं.रु.७९ हजार २०० रुपयांची वेगवेगळया कंपनीच्या सिगारेटची पाकीटे असा मुद्देमाल मिळून आल्याने त्याबाबत चतु:श्रृंगी पो.स्टे. गुन्हा दाखल केला असून तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब), महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना २०२० चे कलम ११ सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम २००३ व नियम २००४ चे कलम ७(२), २०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरचे इसमाने सिगारेट तंबाखूजन्य पदार्थांचा माल कोठून आणला आहे या बाबत अधिकारी व कर्मचारी हे माहिती घेत आहेत.तसेच
हडपसर पो.स्टे. हद्दीमध्ये पोलीस असे पेट्रोलींग फिरत असतांना त्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे मुकुल सुनील भंडारी ,वय –२६ वर्षे, रा.रुक्मीणी निवास,आंबडण चर्च मागे,कृष्णानगर,लेन २२ घर नंबर ४ कोंढवा पुणे याने त्या ठिकाणी कोव्हिड 19 विषाणु प्रादुर्भावाचे अनुषंगाने महाराष्ट्र व केंद्र शासनाने मा.जिल्हाधिकारी पुणे व मा.पोलीस सह आयुक्त, पुणे शहर यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन, त्याचे नमुद दुकानामध्ये मध्ये वेगवेगळया कंपनीच्या देशी विदेशी सिगारेट, प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थ,गायछाप तंबाखु असा एकुण कि रु ८५ हजार ९५० रुपये चा माल विक्रीस ठेवुन त्या ठिकाणी ग्राहकांची खरेदी करण्यास, गर्दी होवुन कोरोना विषाणु चा पादुर्भाव वाढु शकतो हे माहिती असतानाही सदर देशी विदेशी सिगारेट, तंबाुखजन्य पदार्थ, गायछाप तंबाखु विक्रीकरीता ठेवलेल्या असताना मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द भा दं वि कलम 188,269,270 तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51(ब), महाराष्ट्र कोविड 19 उपाय योजना 2020 चे कलम 11 सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम 2003 व नियम 2004 चे कलम 7(2),20(2) प्रमाणे हडपसर पो स्टे येथे गु र. नं 692/2020 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील नमुद कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, बच्चन सिंग, सहा पो आयुक्त, अभियोग, विजय चौधरी यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक, पुर्व विभाग, गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, सहा. पोलीस निरीक्षक बापु रायकर, सहा पोलीस उप निरीक्षक दिलीप जोशी, प्रविण शिर्के, अविनाश शिंदे, अर्जुन दिवेकर, पो हवा राहुल जोशी, प्रफुल्ल साबळे, शिवाजी राहिगुडे, पोलीस नाईक विशाल शिंदे, रामचंद्र यादव, अमित छडीदार, योगेश मोहीते यांनी केली आहे.