पुणे दि २०:- कोरोना विषाणुचा ( Covid 19 ) प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन घोषीत केला आहे . त्यामुळे अनेक मजुरांचे दैनंदिन उपजिविकेच्या , तसेच बेघर , परप्रांतीय कामगार , सेक्स वर्कर , तृतीय पंथीय , बाहेर गावचे विद्यार्थी , पुणे शहरातील ससून हॉस्पीटल , कमला नेहरु
हॉस्पीटल अशा ठिकाणी उपचारासाठी अॅडमिट असणारे रुग्णांचे नातेवाईकांचेही दैनंदिन अन्नधान्य व जेवणाच्या समस्या निर्माण झाल्या . त्यामुळे या वर्गाचे जेवण व अन्नधान्याची समस्या सोडविण्यासाठी डॉ. के . वेंकटेशम् , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांचे संकल्पनेतुन पुणे पोलीसांचा , ‘ सोशल पोलीसींग
सेल ‘ तयार करण्यात आला आहे . त्याकरीता गरजवंतांनी संपर्क करण्यासाठी मो.क्र . ८८०६८०६३०८ हा उपलब्ध करुन देण्यात आला आहे . सोशल पोलीसींग सेल , पुणे चे वतीने , दि . २३ मार्च २०२० पासुन संपुर्ण देशात व राज्यात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर , पुणे शहरातील बेघर , परप्रांतीय कामगार , ईशान्य भारत तसेच परराज्यातील गरजु विद्यार्थी , तृतीय पंथीय , सेक्स
वर्कर , झोपडपट्टीतील रहीवासी , मजुर वर्ग , ससुन हॉस्पिटल तसेच कमला नेहरु हॉस्पिटल येथील रुग्णांचे नातेवाईक इत्यादींना असे मिळून १५ लाख १७ हजार ७८८ अन्न पाकिटे , ६२ हजार ५५७ धान्य किट , ५० हजार ८०७ मास्क , ४ ९ हजार २४७ सॅनिटायझर असे वाटप करण्यात आले असून गरजवंतांना मदतीचे काम अद्यापही सरु आहे . तसेच दि ०९ ते १७ मे २०२० पर्यंत रेल्वे गाड्यांचे माध्यमातून परराज्यातील व्यक्ती ( विद्यार्थी , मजूर इत्यादी ) अशा एकूण १३ रेल्वे गाड्यांमधून १७,८१४
व्यक्तींना , त्यांचे मुळ गावी रवाना होते वेळी , त्यांचे सोबत तेव्हढेच म्हणजे १७,८१४ अन्न पाकिटे व पाणी बॉटल देवून रवाना केले आहे . सदर मदत अद्यापही सुरू आहे . त्याचप्रमाणे दि . ०७ ते १७/०५/२०२० पर्यंत बस गाड्यांचे माध्यमातून परराज्यातील व्यक्ती ( विद्यार्थी , मजूर इत्यादी ) अशा एकूण ४४ ९ बस गाड्यांमधून ११,१४८ व्यक्तींना , त्यांचे मुळ गावी रवाना होते वेळी , त्यांचे सोबत तेव्हढेच म्हणजे ११,१४८ अन्न पाकिटे व पाणी बॉटल देवून रवाना केले आहे . सदर मदत अद्यापही सुरू आहे . मा . पोलीस आयुक्त , पुणे शहर यांचे संकल्पनेतुन तयार
करण्यात आलेल्या सोशल पोलीसींग सेलला, अशोक मोराळे , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे डॉ. संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त , पश्चिम विभाग , पुणे बच्चन सिंह , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , पुणे . विजय चौधरी , सहाय्यक पोलीस आयुक्त , गुन्हे , पुणे हे मार्गदर्शन करीत आहेत . तसेच सदर सेल मध्ये , प्रकाश खांडेकर , पोलीस निरीक्षक , वाहतुक शाखा सुनिल दोरगे , पोलीस निरीक्षक , नियंत्रण कक्ष तसेच वाहतुक विभागाकडील २० कर्मचारी यांचेसह प्रत्येक पो.स्टे . कडील तपास पथकाचे ( DB ) अधिकारी व स्टाफ असे काम करीत आहेत .