पुणे १७ :- पुणे शहरातून १४ हजार ६०० परप्रांतीय श्रमिक / नागरीक रेल्वेने पोलीसांचे मदतीने आपल्या गांवी कोविड -१९ मुळे निर्माण झालेल्या आपतकालीन परिस्थितीत जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये पुणे शहरात अडकून पडलेले परप्रांतीय श्रमिक , विद्यार्थी आणि नागरीक यांना त्यांचे गांवी
पाठविण्याची प्रक्रीया सुरु असून त्याअंतर्गत दिनांक ० ९ ते दि .१५ रोजी पर्यंत सुमारे ११हजार २९ २ परप्रांतीय नागरीकांना आपल्या गांवी परत पाठविण्यात आले आहे तसेच काल दि १६ रोजी दोन रेल्वेने त्यातील पहीली पुणे स्टेशन ते बेतिया बिहार या रेल्वेमधून १४०० परप्रांतीय नागरीकांना रवाना केले आहे
. त्यामध्ये परिमंडळ २, ३, व ५ मधील पोलीस स्टेशन हददीत राहणारे परप्रांतीय श्रमिक / नागरीक यांचा समावेश आहे . तसेच दुसरी रेल्वे ही पुणे स्टेशन ते गोरखपुर उत्तरप्रदेश अशी गेली असून त्यामध्ये १४१० परप्रांतीय श्रमिक / नागरीक समावेश आहे त्यात परिमंडळ १,३,४ व ५ मधील पोलीस स्टेशनचे हददीतील परप्रांतीय नागरीकांचा समावेश आहे . त्यामध्ये परिमंडळ ५ हददीतील ५०० श्रमिक / नागरीक यांचा
समावेश आहे तसेच पुणे स्टेशन येथुन पुण स्टेशन ते राजस्थान अशा सुटणा – या रेल्वेमध्ये पुणे शहर हददीत राहणारे ४०० श्रमिक / नागरीक यांना रवाना करण्यात आले आहे . अशा प्रकारे आज पर्यंत एकुण सुमारे १४ हजार ६०० परप्रांतीय श्रमिक / नागरीक यांना त्यांचे मुळ गांवी परत पाठविण्यात आले आहे . सदर रेल्वेने प्रवास करणा – या नागरीकांना पोलीस स्टेशनचे ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवून त्यांना पी,एम,पी,एल च्या बसमध्ये एका सीटवर एक व्यक्ती अशा पध्दतीने बसवून पुणे रेल्वे स्टेशन येथे आणून त्यांना त्या ठिकाणी सोशल पोलीसिंग सेल , पुणे शहर यांचे वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटायझर , मास्क , साबण , वगैरे देवून त्यांना प्रवासात लागणाया खाण्याची व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.तसेच सदर ठिकाणी आय पी एस ऑफीसर्स वाइज ऑरर्गनायझेशन पुणे ( इच्छज्ज ) यांचे वतीने सदर श्रमिक यांची लहान मुले व वयोवृध्द यांचेसाठी अमुल दुध टेट्रा पॅक २०० मि.ली व गुळ ढेप २५० ग्रॅम हे सोशल पोलीसींग सेल पुणे शहर यांचे मार्फत वाटण्यात आले . प्रवास करणा – या परप्रांतीय नागरीकामधील काही नागरीकांनी पोलीसांनी केलेल्या सोयीबददल आभार व्यक्त केले व आम्हांला वाटले नव्हते आम्ही एवढया लवकर आपल्या गांवी जावू अशी भावना त्यांनी व्यक्त केली . सदर कामगिरी मा.पोलीस आयुक्तडॉ . के वेकटेशम् व पोलीस सह आयुक्त डॉ . रवींद्र शिसवे यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त डॉ . संजय शिंदे , अपर पोलीस आयुक्त. अशोक मोराळे , पोलीस उप – आयुक्त सारंग आव्हाड,सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा.विजय चौधरी, नोडल अधिकारी तसेच पुणे शहर परिमंडळ १ ते ५ चे पोलीस उप – आयुक्त , विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त व संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांचे अधिपत्या खालील स्टाफ यांनी केली आहे .