पुणे दि १७ :- पुणे शहरातून हजारो मजूर पाई चालत प्रवास करताना दिसून येत आहे आहेत त्यातच एक बाई सहा – सहा महिन्याचं पोट, कडेवर दोन -अडीच वर्षाचं लेकरू, डोकयावर घर संसाराचे किडुक -मिडूक चं मनभर ओझं सोबत पाच -सहा वर्षाची सावळी लोभस पण सुकून गेलेली पोरं..संगतीला पुरुष माणूस कोणी नाही आणी बाई निघाली होती चालत. डोळ्यात शून्य भाव जणू काही चालणं हेच जीवन आहे, हा प्रवास अनंतापर्यंत आहे आणी मला तिथं जायचं आहे. कोणाच्याच तोंडाला मास्क नाही. बाई दिसली खराडी नाक्यावर.. माऊलीला अढवून विचारलं कुठे चालली आहेस बाई. तिला बहुतेक समजलं नसावं, मी हिंदीतून संभाषण केले. तेंव्हा कळले मदर इंडिया पौड वरून मध्यप्रदेश ला निघाली होती. मी हादरून गेलो 100 किलोमीटर अंतर तिने तोडलं होतं. नियती कोणची परीक्षा पहात होती? तिची? कायदा सुवस्था राखणारीची? की मानवतेची? तिलाच ठाऊक, मला तिच्या कडेवरच्या मुलाचे ठिकाणी मीच दिसू लागलो, तोंडातून शब्द फुटत न्हवता. सुचत न्हवते तिला रोखायचे? परत पाठवायचे? की शेल्टर होम मध्ये ठेवायचे की जाऊ दयाचे?आई बस एवढीच तिची ओळख माझ्या लेखी तरी राहिली होती. तिला बसवलं, दोन घोट पाणी दिले, लेकरा च्या डोई वरून हात फिरवला करोना ची भीती राहिली न्हवती, एका अर्थाने करोना हरला होता. अश्या माऊल्या जागो जागी दिसत होत्या, भविष्याचे विचारात हरविलेले राम , रहीम , अँटोनी, दिसत होते.त्याच वेळी मोबाईल वाजला माझ्या बॉस चा फोन होता, विचारात होते काय चाललय, त्याना रस्त्यावरची परिस्तिथी सांगितली. तेही भावप्रधान त्यानी एकच वाक्य उच्चारलं “खटके कुछ करेंगे ” नंतर मी मदर इंडिया ला थोडं बसतं केले, पुन्हा बॉस चा फोन आला MP साठी काही ST बसेस ची मी सोय करतोय थोडं थांबा.आणी पुन्हा तास-दोन तासांनी आदेश आले 6 बसेस MP साठी पाठवत आहे एका बस मध्ये 22 जण तयार ठेवा. मदर इंडिया होती, तिच्या सोबतीने अजून 131 जणांची सोय केली.. बस म्हणजे लाल परी आवडती ST, अगदी पहिल्या सीटवरच मदर इंडिया अन तिची ती लोभस पोरं बसविली , 2 दिवसात पोरं पहिल्यांदाच हसत होती. फोटो काढायचा मोह झाला..लाल परी ने आनंद मिळवून दिला ST महामंडळ, आणी माझे बॉस (साहेब ) शतशः आभारी आहे..