पुणे, दि.१७ दिल्लीहून विशेष रेल्वेने दि. १६ मे रोजी निघालेले महाराष्ट्रातील 1 हजार 345 विद्यार्थी आज परतणार असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील 160 विद्यार्थी याठिकाणी पोहोचत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.महाराष्ट्रातील एकूण 1345 विद्यार्थी दिल्लीहून परतत असून भुसावळ, नाशिक, कल्याण व पुणे रेल्वे स्थानकावर हे विद्यार्थी उतरणार आहेत.पुणे रेल्वे स्थानकावर 489 विद्यार्थी उतरणार असून यापैकी
पुणे जिल्ह्यातील- 160 विद्यार्थी,
सातारा जिल्ह्यातील- 57
सांगली-40
कोल्हापूर- 60
लातूर- 62
उस्मानाबाद-32
सोलापूर-68
सिंधुदुर्ग-2
रत्नागिरी जिल्ह्यातील -8
विद्यार्थी या विशेष रेल्वेने येणार आहेत, असेही जिल्हाधिकारी . राम यांनी सांगितले.