पुणे, दि १६ :- चतुर्श्रुंगी पोलीस ठाणेचे हद्दीत बाणेर येथे युनिट ४ गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून १६ हजार १८५ रुपयांची बंदी असणारा गुटखा व सिंगारेटचा साठा पकडला आहे. एकाला पकडण्यात आले कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांनी सर्व देशभरात लॉकडाऊन घोषित केलेला असून परिस्थितीचा फायदा घेवून अत्यावश्यक वस्तूंची साठेबाजी व चढया दराने विक्री करणा-या दुकानदारांवर, बेकायदेशीर हातभट्टी दारु तसेच सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणा-यांवर कारवाई करणेबाबतचे आदेश पोलीस आयुक्त,पुणे शहर यांनी पुणे शहरातील सर्व अधिकारी व कर्मचा-यांना दिले आहेत व त्या बाबत मा अपर पोलीस आयुक्त, अशोक मोराळे यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.सदर आदेशाचे अनुशंगाने गुन्हे शाखेचेअप्पर पोलीस आयुक्त, अशोक मोराळे,मा.पोलीस उपआयुक्त.बच्चन सिंह यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आपापले हद्दीमध्ये गोपनीय माहिती काढून पेट्रोलिंग करून कारवाई करणेबाबत आदेशित केलेले आहे. त्यानुसार मा.सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा.विजय चौधरी व पोलीस निरीक्षक.अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-०४ कडील अधिकारी व कर्मचारी कारवाई करणे बाबत आदेशित केले आहेत.युनिट-०४, गुन्हे शाखा पुणे कडील सहा.पोलीस निरीक्षक, गणेश पवार, स.पो.फौ. पाटील पो.ना. शिर्के, पो.ना.फुलसुंदर, पो.ना.काळे हे चतु:श्रृंगी पो.स्टे.चे हद्दीमध्ये कोरोना विषाणुंचा वाढता प्रादर्भाव व शहरात लॉकडाऊन संचारबंदीचे अनुष्ंगाने तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करणेसाठी पेट्रोलींग फिरत असतांना पो.ना. विशाल शिर्के व पो.ना. दत्तात्रय फुलसुंदर यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे रेशम सखुर खान, वय- ३५ वर्षे, रा. वीरभद्रनगर, बाणेर, पुणे याचे जी.ऐ. सुपर मार्केट, वीरभद्रनगर, बाणेर, पुणे या किराण दुकानात चोरुन तंबाखूजन्य सिगारेट बाजारभावापेक्षा चढया भावाने ओळखीच्या लोकांना विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दोन पंचां समक्ष वरील स्टाफचे मदतीने छापा टाकुन किं.रु.१६ हजार १८५ रुपयांची वेगवेगळया कंपनीच्या सिगारेटची पाकीटे असा मुद्देमाल मिळून आल्याने त्याबाबत चतु:श्रृंगी पो.स्टे. गुन्हा दाखल केला असून तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब), महाराष्ट्र कोविड १९ उपाय योजना २०२० चे कलम ११ सिगारेट व इतर तंबाखु उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) अधिनियम २००३ व नियम २००४ चे कलम ७(२), २०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरचे इसमाने सिगारेट तंबाखूजन्य पदार्थांचा माल कोठून आणला आहे या बाबत युनिट-४ कडील अधिकारी व कर्मचारी हे माहिती घेत आहेत.तसेच येरवडा पो.स्टे. हद्दीमध्ये पो.ना. शिवतरे, पो.शि.घोरपडे, पो.शि.राठोड असे पेट्रोलींग फिरत असतांना पो.शि. सागर घोरपडे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे मेहबुब लालमियाँ शेख, वय-४० वर्षे, रा. स.नं.१२, लक्ष्मीनगर, गुलमोहर नर्सरी शेजारी, येरवडा, पुणे-६ हा चोरुन गोवा गुटखा व बादशहा पानमसाला ओळखीच्या लोकांना चढया भावाने ओळखीच्या लोकांना विक्री करीत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने मा. सहाय्यक आयुक्त सोा, अन्न व औषध प्रशासन, (म.रा),पुणे यांचे करवी दोन पंचां समक्ष वरील स्टाफचे मदतीने छापा टाकुन किं.रु.९,हजार २८० रुपया च्या एकुण ५७ पुडे बादशहा पानमसाला व एकुण २७ पुडे गोवा गुटखा पुडया असा मुद्देमाल मिळून आल्याने त्याबाबत येरवडा पो.स्टे.गु.र.नं.1764/2020, भा.दं.वि. कलम 272,273 व अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 चे कलम 26(2)(त्), 26(2)(त्ध्), 27(3)ड्ड, सह वाचन 3(त्), (न्न्न्न्), (ध्), चे उल्लंघन केलेने कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदरचे इसमाने तंबाखूजन्य गोवा गुटखा व बादशहा पानमसाला माल कोठून आणला आहे या बाबत युनिट-४ कडील अधिकारी व कर्मचारी हे माहिती घेत आहेत.असे दोन्ही कारवाईमध्ये युनिट-४ कडील अधिकारी व कर्मचारी यांनी तंबाखूजन्य पदार्थ किं.रु.२५ हजार,४६५ रूपयांचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे,बच्चन सिंह, सहा. पोलीस आयुक्त, विजय चौधरी, पोलीस निरीक्षक, युनिट -४, गुन्हे शाखा,अंजुम बागवान यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गणेश पवार, सहा.पोलीस फौजदार भालचंद्र बोरकर, शंकर पाटील, पो.ना.दत्तात्रय फुलसुंदर, विशाल शिर्के, गणेश काळे, सागर घोरपडे, रमेश राठोड, अतुल मेंगे, निलेश शिवतरे, शितल शिंदे, सुहास कदम सर्व नेमणूक गुन्हे शाखा-युनिट-४ यांनी केलेली आहे.