पुणे दि १३ :- पुणे शहरात पर्वती दर्शन येथ नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये प्रत्येकांनी तोंडाला मास्क लावावे या साठी दत्तवाडी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक श्री सूर्यकांत सप्ताळे हे स्थानिक विशेष पोलीस अधिकारी यांच्या समवेत पायी गस्त घालत होते.त्या वेळेस एक मानसिक रूग्ण व्यक्ती विना मास्क चा फिरत असल्याचे त्यांना दिसला.त्या व्यक्तीला मास्क घालण्या संदर्भात त्यांनी समजावलं परंतु त्यांची एकण्याची मानसिकता नव्हती परंतु तो व्यक्ती जरी मानसिक रुग्ण असला तरी त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि त्या व्यक्ती मुळे इतरांना या साथीच्या रोगाचा प्रसार होऊ शकतो याची सामाजिक जाणिव झाल्याने श्री सूर्यकांत सपताळे यांनी स्वतः पर्वती दर्शन SPO(विशेष पोलीस अधिकारी) यांच्या मदतीने त्यांच्या चेहऱ्यावर मास्क बांधुन दिले व त्यांना योग्य ती काळजी घ्यायला सांगितली …! अशा तऱ्हेने प्रत्येक व्यक्तीला कोरोनाच्या युद्धात शर्थीचे प्रयत्न करून वाचवायचे आहे हा जणू चंगच आम्ही बांधला आहे आणि आम्ही आमचा निश्चय पूर्ण करणार. हा आमचा ठाम विश्वास आहे.