कोथरूड-बावधनमध्ये पुणे महापालिकेचे अतिक्रमण विभागाची धडक कारवाई; ६ हातगाड्या, २९ पथाऱ्या व २५ शेड्स हटवले

पुणे, दि. २० :-कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग व बांधकाम विभागामार्फत संयुक्त कारवाई करण्यात आली. अनधिकृत अतिक्रमणांवर आळा घालण्यासाठी ही धडक मोहीम राबविण्यात आली.


या कारवाईसाठी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, बिगारी सेवक तसेच कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक राहुल डोके, सहाय्यक संतोष मेथे आणि अमोल गावंडे यांच्या पथकाने सहभाग घेतला. कारवाईदरम्यान रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या हातगाड्या, पथाऱ्या, काउंटर व अन्य साहित्य हटवून जप्त करण्यात आले.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपआयुक्त सोमनाथ बनकर आणि महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढेही नियमित व वारंवार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अतिक्रमण निरीक्षक राहुल डोके यांनी दिली.
कारवाईचा तपशील :
हातगाडी – ०६
पथारी – २९
काउंटर – ०२
कच्चे-पक्के शेड – २५
बांधीव ओटे – ०३
इतर साहित्य –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *